स्वत:ला सामावून घेतले…
अतरंगी रंगाच्या बागेत,अस्तित्वाचे एक बीज पेरले
चमचमत्या देखाव्यात, जणू भाग्य माझे खुलले….
अन् वर्तमानात, भविष्येची कित्येक स्वप्न सजले.
अशा खोट्या धारणेत, आता मी स्वतःला सामावून घेतले….
अचूकतेच्या वाटेला ,चूकीचा सुराग लागला..
अन् सुसज्ज माणसाला, कुविचाराचा वारा लागला…
विश्वासाच्या खोट्या धुक्यात, अनेक मुखवटे दिसले
विश्वाच्या अफाट पसार्यात,आता मी स्वतःला सामावून
घेतले….
निर्मळ आसमंतात, प्रीतीचे रंग बहरले.
अन् दुषित हवेत, निष्पाप फुले कोमेजले
भावनेच्या जाळ्यात, काळीज माझे गुंतले,
अशा फसवणूकीच्या बाजारात,आता मी स्वत:ला सामावून घेतले….
विवेक हा ,इतरांसाठी निस्वार्थ झाला.
पण प्रतिमेत,इतरांचा केवळ स्वार्थ दिसला.
वास्तविकतेचे वास्तव पाहूनी,अंतरंग हे पेटले,
शेवटी अशा वणव्यात, आता मी स्वत:ला सामावून घेतले.
-सानिका
# milyin.com
#Lyricolicsoul
Comments