‘अ कप ऑफ पॉझीटीव्हीटी..’

    0
    0

    12th September 2024 | 4 Views | 0 Likes

    Info: This Creation is monetized via ads and affiliate links. We may earn from promoting them.

    Toggle

    अ कप ऑफ पॉझीटीव्हीटी..Tea G9240a9026 1920

     

    ब्रेक अप होऊन १ महिना झाला तरी आभा च्या मनातून नील जात नव्हता. ब्रेक अप झाल्या नंतर आभा एकही दिवस शांतपणे झोपू शकली नव्हती. तिच्यासाठी आयुष्य एकदमच उदास झाल होत. तिला नीलची इतकी सवय झाली होती आणि नील ‘मला आता हे नातं नको आहे’ अस म्हणून तिला एकट सोडून निघून गेला होता. त्याने काहीही कारण देखील सांगितलं नाही आणि तसाच निघून गेला. दोघांच सुंदर नातं एका क्षणात संपुष्टात आल होत. आभाळ कोसळल्या सारख वाटलं आभाला. आभा नील मध्ये खूपच अडकली होती. तिच आयुष्य नील वर सुरु होऊन नील वर संपत होत. आभासाठी नात्याच्या नावापेक्षा नात्यातली सत्यता जास्त महत्वाची होती त्यामुळे नीलच्या लिव इन पर्यायाला तिने कोणताही आक्षेप घेतला नव्हता. सगळ सुरळीत चालू होत आणि अचानक नील तिच्या आयुष्यातून निघून गेला होता. ह्या गोष्टीचा आभाच्या मनावर प्रचंड परिणाम झाला होता. तिचं कामात सुद्धा लक्ष लागत नव्हत. अर्थात ह्या सगळ्याचा परिणाम तिच्या ऑफिस पर्फोर्मंस वर सुद्धा होत होता. कामत लक्ष लागत नाही ते आभा ला अजिबात मान्य नव्हत. तिला नीलला पूर्णपणे मनातून काढून टाकायचं होत पण काय कराव हे मात्र तिला सुचत नव्हत. अश्याच एका दिवशी आभा रस्त्यावरून चालत होती. आभा चालत होती पण विचारांचं काहूर मात्र तिची पाठ सोडत नव्हत. तिच डोक भणभणायला लागल. काहीतरी पेय पाहिजे आणि समोरच तिला कॉफी शॉप दिसलं आणि नकळत ती आत शिरली. कॉफी शॉप मध्ये क्वचित गर्दी असायची पण त्या दिवशी मात्र कॉफी शॉप भरलेल होत. आभा आत शिरली खरी पण लोकांची बडबड तिला सहन होत न्हवती पण तिला कॉफी मात्र हवीच होती. पटकन कॉफी पिऊन बाहेर पडू असा विचार करत तिने सगळीकडे नजर फिरवली. तिच्या नशिबाने कडेच्या टेबल वर कोणी बसलेल नव्हत आणि ती खुश झाली. पटकन त्या टेबल जवळ आली तितक्यात एक रुबाबदार देखणा मुलगा तिथे येऊन बसला. तो एकटाच होता. त्याने आपली जागा घेतली हे पाहून आभा संतापली,

     

    आभा- “ओह.. हॅलो मिस्टर..मी इथे बसतीये!” आभाच्या बोलण्यातून ती चिडलीये हे त्या मुलाला जाणवलं आणि तो जरा सावरून बसला..

     

    आभा- “उठा इथून! अस वागण्याची पद्धत नसते…” आभा बोलली आणि पुढे काहीतरी पुटपुटली.

     

    “सॉरी पण तुम्ही आधी टेबल बुक केल होत का? इथे रिझर्वड असा काही दिसत नाहीये आणि मी आधी बसलो होतो.”

     

    “टेबल बुक केल नाही म्हणून काय झाल? मला आत्ता कॉफी हवीये हो.. माझ डोक भणभणतय.. तुम्ही प्लीज दुसरी कडे जाऊन बसता का?”

     

    “अहो मॅडम, मला पण कॉफी हवीये म्हणूनच मी इथे आलोय..आणि दुसरीकडे कुठे जागा दिसती आहे का तुम्हाला? जागा असेल तर ती दाखवला मग मी तिथे बसतो.. माझी काही हरकत नाही..” तो मुलगा शांतपणे उत्तरला.

     

    आभाने चौफेर नजर फिरवली पण एकही टेबल रिकाम नव्हतं तिने मानेनेच नकार दिला आणि शेवटी बोलायला लागली,

     

    “जाऊदेत..मीच जाते! तुम्ही प्या कॉफी..आणि सॉरी! मी जरा जास्तीच चिडले.. पण मला आत्ता कॉफीची खूप गरज होती.”

     

    “सॉरी बिरी नको हो.. बाय द वे, टेबलची समोरची जागा रिकामी आहे.. यु कॅन सीट देअर अॅण्ड हॅव्ह युअर कॉफी! मला काही प्रॉब्लेम नाही..”

     

    आभाने थोडा विचार केला… आणि ‘जाऊदेत इथे बसते कॉफी पिते आणि जाते’ असा विचार करत मानेनेच होकार देत ती तिथेच त्या मुलासमोर बसली… मग मात्र ती त्या मुलाशी काहीच बोलली नाही आणि तिने मेन्यू कार्ड पाहिलं.. पटकन उठली आणि हॉट कॅपेचीनोची ऑर्डर देऊन आली.. मग ती डोळे बंद करून बसली.. तो मुलगा विचारात पडला.. आत्ता भांडणारी मुलगी एकदम शांत डोळे मिटून का बसली.. त्याने तो विचार झटकला. आणि त्याने सुद्धा मेन्यू पहिला आणि त्याने त्याची ऑर्डर दिली मग तो त्याचा मोबाईल पाहायला लागला. तितक्यात आभाची कॉफी आली. वेटरच्या येण्यानी आभाची तंद्री गेली. आणि तिने समोर कॉफी मग पाहिल्यावर तिला हायस वाटल. तिच्या चेहऱ्यावर छोटस हसू आल. आभा कॉफी कडे पाहत होती आणि तिने त्या मुलाकडे देखील पाहिलं. आभा पुन्हा हसली..आणि कॉफीचा घोट घेतला. तिला जाणवलं, त्या मुलाला भेटल्यापासून तिने एकदाही नीलचा विचार केला नव्हता. म्हणजे नीलचा विचार मनातून काढून टाकण इतकाही अवघड नाही हे आभाला जाणवलं..

     

    तो मुलगा आभा कडे पाहत होता. इतक्या वेळात पहिल्यांदाच आभा हसली होती. त्याला आश्यर्य वाटल. आणि त्याने न राहवून तो आभाशी बोलायला लागला,

     

    “हसलात..तुम्ही!! आल्यापासून वैतागलेल्या होतात.. माणसाने हसावं! मला अस वाटतंय तुम्ही कसल्यातरी तणावाखाली आहात. काय ताण आहे ते मी न्हाई विचारणार.. अनोळखी लोकांशी इतक ओपन लगेच मी पण बोलत नाही. पण मी एक सांगू? म्हणजे सांगतोच, कोणत्याही गोष्टीने आपल्या आयुष्यावर फार परिणाम होऊन द्यायचा नाही. कशाला द्यायचा मी म्हणतो? त्रास,मनस्ताप होत असतातच.. मला पण बऱ्याच वेळा होतात त्रास! मी इथे आलोय कारण आत्ताच माझ्या मैत्रिणीशी भांडण झालय..कामत लक्ष लागत नाहीये..सो नीडेड अ कॉफी ब्रेक! वातावरण बदल झाला की मन हलक होत. तोच विचार करत बसलो असतो तर मात्र मला त्रास झाला असता. जे आत्ता आहे ते खर अस मानून आयुष्य जगलं की कोणताच त्रास होत नाही. म्हणजे त्रास असतातच पण त्याची तीव्रता नक्की कमी होते. आणि सॉरी! मी हे सगळ सांगायची गरज नसेल कदाचित.. म्हणजे नव्हतीच.. जाण ना पहचान पण मी बोललो!!”

     

    आभा काहीच बोलली नाही. त्या मुलाला जाणवलं आपण अनोळखी व्यक्तीशी बोलायला नको होत. मग मात्र त्या मुलाने कॉफी प्यायला सुरु केल आणि आभाकडे पाहिलं सुद्धा नाही. इकडेतिकडे पाहत तो कॉफी घेत होता. त्याने त्या मुलीशी नजरानजर टाळली. जरा वेळ शांततेत गेला. त्या मुलाच बोलण ऐकून आभाचा मूड बदलला होता. काहीतरी मिळाल्यासारख तिच्या डोळ्यातून वाटत होत. तिने कॉफी संपवली. आणि शांतता भंग करत आभा बोलायला लागली,

     

    “थँक्यू सो मच!! पहिली गोष्ट, तुमच्यामुळे मला आत्ता कॉफी प्यायला मिळाली.. म्हणजे तुम्ही म्हणला नसतात की इथे बस तर मी अजून वैतागून बाहेर निघून गेले असते. त्याने मला अजूनच त्रास झाला असता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्ही जे काही अनावधाने मला सांगितलं ते खूप महत्वाच होतं. तुम्हाला माहिती नाही तुम्ही माझी किती मदत केलीये!! तुम्ही बरोबर ओळखलं.. हो, माझ्या आयुष्यात खूप गोष्टी अचानक बदलल्या. माझ माझ्या बॉय फ्रेंड बरोबर ब्रेक अप झाल म्हणून मी गेले कैक दिवस दुखात होते. त्यातून मला बाहेर पडता येत नव्हत. आधी माझ्यासाठी आयुष्य म्हणजे तोच होता पण तुमच बोलण ऐकून मला त्याच्याशिवाय आयुष्य जगायला नवीन उर्जा मिळाली. थोडक्या शब्दात आयुष्याच सार सांगितलं तुम्ही!! तो अगदी माझ्या जवळचा पण मला दुखवून निघून गेला आणि तुम्ही मला अनोळखी असून मला आयुष्याचा अर्थ सांगून गेलात.. तुमचे खूप धन्यवाद! आणि हो, तुमच गर्ल फ्रेंडशी झालेलं भांडण लवकरच मिटेल!!”

     

    तो मुलगा ऐकत होता.. त्याचे डोळे सुद्धा लकाकले, कोणालातरी मदत केल्याच समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत.

     

    “माय प्लेजर!!” तो मुलगा इतकच बोलला.. मग मात्र आभा तिथे थांबली नाही. लगबगीने कॉफी शॉप च्या बाहेर पडली आणि तिला नवं विश्व खुणावत होत. आता दोघ परत एकमेकांना भेटणार का नाही हे दोघांनाही माहिती नव्हत पण आभाला कॉफी शॉप मध्ये खूप काहीतरी मिळाल होत आणि त्या मुलाला सुद्धा काहीतरी चांगल केल्याच समाधान मिळाल होत. एका कॉफीच्या कपाने आभाच आयुष्य बदलून टाकल होत.

     

    म्हणूनच, आयुष्यात हवा- ‘अ कप ऑफ पॉझीटीव्हीटी..’

    ———————————————————————————————————————–

     

     

     

     

    You may also like