ध्येया विना जीवन नसावं,
काम नसावं……
अशा प्राप्तीसाठी तुफाना समोरही
बलवान असावं….
आजच्या स्वार्थात उद्याचा
निस्वार्थ असावा…
अन् आजच्या परिश्रमात येणारा
विजय असावा…
तुझी क्षमता गगनासही
भिडून जावी…
अन् ध्येयाप्रतीची आस्था
जिवित असावी….
जेव्हा तू एक भरभक्कम
तरू असेल,
तेव्हा तुझ्या गगनभरारीचा
दिवस दूर नसेल…
तुझ्या प्रत्येक एका श्वासात
जिद्द असावी..
अन् स्वप्नपूर्ती साठी केवळ
आज मेहनत असावी..
Comments