पावसाच्या सरी

    Monish Itadkar
    @Monish-Itadkar
    0 Followers
    0
    0
    0
    0
    0 Likes | 4 Views | Sep 12, 202471676 | 2727

    पावसाच्या पहिल्या सरी,
    आतुर झालेल्या मनाला,
    वाट बघणाऱ्या डोळ्यांना
    कठोर झालेल्या मातीला
    तृप्त करुनी गेल्या, मायेच्या दुनियेत रंगवून गेल्या

    पावसाच्या पहिल्या सरी
    आनंदी चातकाला पियूष पाजूनी
    सुंदरशा मोराला वनी नाचवूनी
    रुक्ष झालेल्या वृक्षांना फुलवूनी
    सुगंध पसरूनी गेल्या, मायेच्या दुनियेत रंगवून गेल्या