Eab039dc 53b3 4e3d A368 0532580ba8c9

तो, ती आणि उनाड वारा

    Ashish Devrukhkar
    @dashish09
    0 Followers
    0
    0
    0
    0
    0 Likes | 6 Views | Sep 12, 2024425316 | 6032

    "ऐक ना.....
    अरे वाऱ्या तुलाच सांगतोय, एकदा बघ तरी इकडे. किती अबोल आहेस रे. मी तुला निरोप द्यायला बोलावलं तर तू काहीच बोलत नाहीस. तिच्याकडे जाशील तेव्हा बोलशील ना? की असाच गप्प राहशील? माझा निरोप पोहचवशील ना? बोल ना रे....
    तिला सांग की त्याच्या प्रेमाचे मर्म घेऊन उनाड होऊन आलोय मी, मी म्हणजे तू हा वाऱ्या, नाहीतर मला शोधत बसेल ती. हा तर कुठे होतो मी???
    त्याच्या प्रेमाचे मर्म घेऊन उनाड होऊन आलोय निरोप द्याया खास.. 
    सोबत आणलाय त्याचा श्वास, बघ होतंय का तुला त्याचा भास..
    मग ती जे काही सांगेल तो शब्द आणि शब्द टिपून घे आणि तडक माझ्याकडे निघून ये. समजलं ना..."
    वारा सुसाट तिच्याकडे घोंगावत गेला. ती नदीकिनारी बसली होती वाट बघत आणि तिला पाहून तो घोंगावणारा वारा एक मंद झुळूक बनून तिला छेडून पुढे गेला.
    "आलास काय रे वेड्या, तुझं ना मी नाव सांगणार आहे त्याला की तू मला छेडत असतोस."
    वारा खुदकन हसला आणि त्याने निरोप धाडला.
    उत्तरादाखल ती म्हणाली...
    "असाच जा तू घोंगावत वाऱ्या, माझ्या स्पर्शाचा गंध घेऊन..
    वाटेल त्याला जणू, गेलाय तो मिठीत माझ्या चिंब भिजून...
     
    मग मिळेल माझ्या मनाला सुख, मग मिळेल माझ्या मनाला सुख..
    ये ना रे सख्या आता नको ना इतका तरसवूस, नको ना तरसवूस...
    सांगशील ना रे त्याला?"
    बिचारा वारा.... दोघांचे प्रेम आणि भेटीची तळमळ त्याला कळत होती पण तो निरोप देण्याशिवाय काहीच करू शकत नव्हता. तिचा निरोप घेऊन तो तडक निघाला पण वाटेत खूप रडला. धरणीला भिजवून गेला. शेवटी देवाला बोलला....
    "नको ना मांडू प्रेमाचा खेळ असा, नको ना मांडू प्रेमाचा खेळ असा .....
    भेटव रे दोघांना, ती रात्र आणि तो पुनवेचा चंद्र जसा, चंद्र जसा..."
    ©आशू  (आशिष देवरुखकर)